नाशिक : दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात

0

वेगवान न्यूज / गणेश सोनवणे

सटाणा : देशी दारू बाटल्यांची वाहतूक करत असलेला टेम्पो सटाणा – देवळा रोडवरील मोरे नगर गायत्री सर्विस स्टेशन समोर गुरुवार (दि २९) दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक डाव्या बाजूचे मागचे टायर फुटल्याने टेम्पो उलटला.

नासिक येथून सटाणा तालुक्यातील तहाराबाद येथे देशी दारू (टैंगो) घेऊन जाणारा टेंम्पो क्रमांक (MH 15-AG 5886) गुरूवार दि. २९ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मोरेनगर गावा जवळील सबस्टेशन समोर डाव्या बाजूचे मागचे टायर फुटल्याने टेंम्पो जागीच पलटी झाला. टायर फुटल्याचा आवाज ऐकुण परिसरातील नागरीक रस्त्यावर आल्यावर त्यांना टेंम्पोचा अपघात झाल्याचे दिसले. यावेळी येथिल सामाजीक कार्यकर्ते परशुराम पाकळे, पिंपळदरचे सरपंच संदीप पवार, बाळा देवरे, महावितरण कंपनीचे कर्मचारी यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दारुच्या बाटल्यांच्या खोक्यांखाली अडकलेल्या कामगारांना व कॅबीन मध्ये अडकलेला टेम्पो चालक व क्लिनर यांना बाहेर काढून तात्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघातात शुभम रवी नायक (वय २५) नासिक रोड याचा उजवा हात फॅक्चर होऊन हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच चेहऱ्यास दारूच्या बाटल्यांचे काच लागून गंभिर जखमा झाल्या आहेत तर चालक फकीरा भगवंता बर्वे (वय५०), संजय नामदेव डांबेकर( वय५२), देविदास श्रीधर भालेराव (वय२८) नासिक रोड, आनंद शंकर पगारे(पिंपळदरा) हे किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे , पो.कॉनस्टेबल पुंडलीक डंबाळे,अजय महाजन, योगेश गुंजाळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. अपघात स्थळी आगीसारखी दुर्घटना घडू नये यासाठी सटाणा नगर परिषरीषदेची अग्नीशामक गाडीही तात्काळ दाखल झाली होती. या अपघातामुळे रस्त्यावर दारूच्या काचेच्या बाटल्या फुटल्याने काचांचा खच दिसत होता.

टेम्पो मधील दारूचे बॉक्स परिसरातील काही तळीरामांनी पळवून नेले. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर मात्र दारूचे बॉक्स नेण्यासाठी आलेले तळीराम पळून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here