देवळा तालुक्यात अजून 1 करोना पॉझिटिव्ह; चिंतेत भर

0

वेगवान न्यूज / मनोज वैद्य

दहिवड (७ जुलै) नाशिक जिल्ह्यातील कांद्याची मोठी बाजारपेठ व देवळा तालुक्यात व्यापारी दृष्ट्या महत्वपूर्ण अशा उमराणा या गावात 2 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आल्याने उमराणाकरांच्या व देवळा तालुकावासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.
आज सांयकाळी पहिल्या अहवालामध्ये एका महिला पाॅझिटिव्ह आली होती होती . पुन्हा एका तासामध्ये दुसरा अहवाल मध्ये अजून एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे. त्यामुळे देवळा तालुक्यात आज दोन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
देवळा तालुक्यात करोनाचे रुग्ण वाढतच असून ५ जुलै रोजी उमराणा येथील एका ६० वर्षीय महिलेचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्य
त्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील ७ व्यक्ती व देवळा येथील ५ अशा १२ जणांचे स्वॅब त्यानंतर प्रशासनाने तपासणीसाठी  पाठवले होते.
त्याचा आव्हाल नुकताच तालुका प्रशासनास प्राप्त झाला असून १२ पैकी उमराणा येथील ४० वर्षीय पुरुषाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून उर्वरित ११ रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती देवळा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी वेगवान न्यूजला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here