नाशिक – निफाड तालुक्यातील 10 कोरोना बाधित रुग्णांची कोरोना मात !

0

वेगवान न्यूज / समीर पठाण

लासलगाव l येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेले 10 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोना मात केल्याने आज डिस्चार्ज देण्यात आला.यात एका चार वर्षांच्या चिमुकल्याचा ही समावेश आहे.

निफाड तालुक्यातील लासलगाव येथील एकाच कुटुंबातील खाजगी डॉक्टरसह सहा तर विंचूर येथील तीन जण असे 10 कोरोना बाधित रुग्ण लासलगाव ग्रामीण रुग्णालयात येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपचार घेत होते.या दहा कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने घरवापसी केली आहे ही बाब दिलासा देणारी ठरली आहे.

या दहा रुग्णांना डिस्चार्ज देताना डॉक्टर परिचारिका आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी पुष्पवृष्टी करत टाळ्याच्या गजरात अभिनंदन केले यात एका चार वर्षांच्या चिमुकल्याचा ही समावेश आहे.

यावेळी विंचूर येथील एका कोरोनामुक्त रुग्णाने शंभर मास्क कीट भेट दिले असून कोविड येथील सर्व कर्मचारी आणि रुग्णाना जेवण दिले तर लासलगाव येथील एका रुग्णाने चार्जिंग बॅटरी चे दोन सेट देत ऋण व्यक्त केले या कोविड सेंटरमधून गेल्या दोन महिन्यात आजपर्यंत 75 रुग्णांनी कोरोनावर मात करत घरवापसी केली असून 29 रुग्ण अद्याप उपचार घेत असल्याचे कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here