देशातील करोना रुग्णांची संख्या १ लाखावर ! आतापर्यंत किती जणांचा मृत्यू…

0

नवी दिल्ली –

सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत भारतातील करोना रुग्णांची संख्या ही १००१६१ इतकी झालीय. ३११४ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. तर ३८९०९ जण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती वर्ल्डमीटर करोना व्हायरस https://www.worldometers.info/coronavirus/ या वेबसाइटने दिलीय. अनेक राज्यांनी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. यामुळे देशात करोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतेय. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सोमवारी सुरुवात झाली.

लाॅकडाऊन ४ त्यापूर्वीच महाराष्ट्र, पंजाब या राज्यांनी लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला होता. केंद्र सरकारने रविवारी लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली. तसंच नवी नियमावलीही जाहीर केली. यानंतर आज उत्तर प्रदेश आणि तेलंगणने ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याचं जाहीर केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here