वडिलांनी मला लुडो खेळताना चॅटिंग करून हरवलं ! 24 वर्षीय युवतीची कोर्टात धाव

0

भोपाळ l मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून एक अनोखी घटना समोर येत आहे. आहे. भोपाळ मधील एका 24 वर्षांच्या मुलीने आपल्या वडीलांविरुद्ध फॅमेली कोर्टात (Family Court) धाव घेतली आहे.

लॉकडाउनमध्ये अनेकांच्या पसंतीस उतरलेल्या ल्युडो खेळाने कुटूंबात भांडणे लावण्यास सुरुवात केली आहे. ल्युडो हा खेळ खेळताना वडिलांनी मला फसवले आहे. ल्युडो खेळताना माझी फसवणूक करतील अशी अपेक्षा नव्हती असा आरोप करत एका 24 वर्षीय तरुणीने फॅमिली कोर्टात धाव घेतली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ या ठिकाणी ही घटना घडली आहे.

याचे कारण वाचून तुम्ही नक्कीच चक्रावून जाल. लुडो (Ludo) खेळताना वडीलांनी चिटिंग केली असा आरोप करत ही युवती कोर्टाची पायरी चढली आहे. वडीलांवर खूप विश्वास होता. पण त्यांनी धोका दिला. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, अशा भावना या युवतीने वक्त केल्या आहेत.

यावर कोर्ट काऊन्सिलर सरिता (Sarita) या युवतीचे सातत्याने काऊन्सलिंग करत आहे. आतापर्यंत कऊन्सलिंगचे 4 राऊंड झाले आहेत. लूडो खेळताना का होईना पण वडीलांनी तिचा विश्वासघात केला. तिचा वडीलांवर खूप विश्वास होता. पण लुडो खेळताना केलेल्या चिटींगमुळे तिचा विश्वासत घात झाला, असे या युवतीचे म्हणणे असल्याचे कोर्ट काऊन्सिलर सरिता यांनी सांगितले.

तसंच काऊन्सिलर सरिता यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, वडीलांनी केलेल्या विश्वासघातामुळे ती वडीलांवर कायदेशीर कारवाई करु इच्छित आहे. त्यांनी तिला लुडो गेममध्ये चिटिंग करुन हरवल्यामुळे तिचा वडीलांवरील आदर संपुष्टात आला आहे.

तिच्या आनंदासाठी वडील गेम हारु शकत होते. परंतु, त्यांनी असे केले नाही, असे युवतीचे म्हणणे आहे. परंतु, काऊन्सलिंगच्या 4 सेशननंतर तिला पॉझिटीव्ह वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here