लासलगाव शहरात पुन्हा आढळला एक कोरोना बाधित रुग्ण !

0

वेगवान न्यूज / समीर पठाण

लासलगाव –

लासलगाव शहरात कोरोना रुग्णांची साखळी तुटून लासलगावकर कोरोना मुक्त झाले होते परंतु बुधवार २७ मे रोजी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार लासलगाव येथील कोटमगाव रोड परिसरातील ५२ वर्षे वयाच्या पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याने पुन्हा शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत स्थानिक प्रशासनाने लासलगाव चे सर्व व्यवसायिक व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

निफाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ चेतन काळे यांनी दिलेल्या माहिती नुसार हा कोरोना बाधित रुग्ण लासलगाव येथून भाजीपाला घेऊन मुंबई येथे जाऊन भाजीपाल्याचा व्यवसाय करत होता.दि २५ मे रोजी सदर व्यक्तीचा खोकला वाढल्याने त्यास सामान्य रुग्णालय नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्याचे स्वॅब चे नमुने घेण्यात आले होते.दि २७ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ही व्यक्ती कोरणा पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले असून पुन्हा एकदा लासलगावकरांच्या चिंतेत भर पडली आहे

नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची सुरुवात ज्या लासलगाव शहरातून झाली त्याच शहरात पुन्हा एक रुग्ण आढळल्याने प्रचंड खळबळ माजलेली आहे.लासलगाव शहर व परिसरातील गावात आता पर्यंत एकूण नऊ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्या पैकी आठ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांची घरवापसी झाली आहे.नाशिक जिल्ह्यात सर्वत्र कोरोना चे रुग्ण मोठया प्रमाणात आढळत असून या करोनाने निफाड तालुक्यात शिरकाव केलेला आहे.ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here