लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरूध्द लासलगाव पोलीसांची कारवाई

0
वेगवान न्यूज / समीर पठाण
लासलगावः
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन आदेश कायम ठेवले आहे.नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीसांव्दारे वारंवार नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.परंतु विनाकारण मौज म्हणुन अथवा महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर फिरणारे व संचारबंदी चे उल्लंघन करणाऱ्या नागरीकांवर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांनिहाय गुन्हे दाखल करण्यात येत आहे.तसेच दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने मा.न्यायालयात तात्काळ दोषारोप पत्र दाखल करून अशा व्यक्तींना कायदेशीर शिक्षा होण्याचे दृष्टीने सक्त कारवाई करण्याचे निर्देश नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी दिलेले आहे .
याच अनुषंगाने लासलगाव पोलीस ठाण्यात लॉकडाऊन कालावधीत दाखल असलेले ६७ गुन्ह्यामधील आरोपींना मा.न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.संचारबंदी कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इसमांविरूध्द गुन्हे दाखल करून मा.न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.सदर खटल्यांमध्ये मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी निफाड न्यायालयाने सबळ पुराव्यास अनुसरून संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर ६७ गुन्हयांतील आरोपींना भादवि कलम १८८,२६९,२७० मध्ये सी.आर.पी.सी.२५५(२) प्रमाणे शिक्षा ठोठावली असुन एकुण १९,८०० रुपये दंड वसुल करण्यात आलेला आहे.
सदर शिक्षेबाबत लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये या आरोपींची गुन्हेगारी चारित्राबाबतची नोंद घेण्यात आली आहे.संचारबंदी कालावधीत जिल्हयातील पोलीस ठाणे निहाय दाखल गुन्हयांमधील आरोपीतांविरूध्द सक्त भुमिका घेण्यात येणार असुन मा.न्यायालयात लवकरात लवकर दोषारोप सादर करण्यात येत आहे.नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग माधव रेड्डी,लासलगाव पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांचे मार्गदर्शनानुसार लासलगाव पो.स्टे . कडील वरील गुन्हयांचे तपासी अंमलदार व कोर्ट पैरवी हवालदार जी.डी.ठाकुर यांनी गुन्हे शाबीत होण्याचे दृष्टीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here