लासलगावःपिंपळगाव नजीक येथे ४ कोरोना बाधीत रुग्ण

0
वेगवान न्यूज / समीर पठाण
लासलगावः
पिंपळगाव नजीक येथे चार रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लासलगाव येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या खाजगी डॉक्टरच्या परिवारातील चार रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ चेतन काळे यांनी दिली.त्यामुळे आता लासलगाव बरोबरच पिंपळगाव नजीक येथील परीसर  लाॅकडाऊन कडक करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
दि २७ मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधित रुग्ण याच पिंपळगाव नजीक येथे आढळून आला होता यशस्वी उपचारानंतर त्या रुग्णासह अजून एक रुग्ण कोरोना मुक्त होऊन त्यांची घरवापसी झाली आहे.आता त्यांनतर पुन्हा चार कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे.नागरीकांनी घाबरुन जावु नये,आपण घराबाहेर पडु नका,हात वरचेवर साबणाचे पाण्याने स्वच्छ धुवा,आपला हात आपलेच नाक,तोंड,डोळे यांना लावण्याचे टाळा असे आवाहन स्थानिक पोलिस प्रशासन,आरोग्य विभाग तसेच स्थानिक ग्रामपंचायत च्या अधिकाऱ्यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here