स्वातंत्र्यदिन : लाल किल्ल्यावरुन नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष

0

नवी दिल्ली l कोरोनाचं संकट, भारत-चीनदरम्यान सीमेवर निर्माण झालेला तणाव या पार्श्वभूमीवर पंतप्रधान काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकवतील आणि त्यानंतर ते देशाला संबोधित करतील.

त्यापूर्वी नरेंद्र मोदींनी एक ट्वीट करुन देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ध्वजारोहणापूर्वी पंतप्रधान राजघाटावर गेले .

संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देणाऱ्यांमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलासह दिल्ली पोलिसांचे अधिकारी आणि 24 जवान सहभागी होतील.मेजर श्वेता पांडे ध्वजारोहणादरम्यान पंतप्रधानांसोबत असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here