लबाड चीनने कोरोना बाबत भारताला दिला धोका l वाचा सविस्तर?

0

नवी दिल्ली l परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) लबाड चीन बाबत माहिती दिली असून चीनने कोरोना बाबत एक आठवडा उशीरा भारताला माहिती दिल्याचं उघड केलं आहे. महाभयंकर साथ असतानाही चीनने तब्बल आठवडाभर उशीरा माहिती सांगणं हे गंभीर असल्याचं सांगितलं जातं.

चीनमध्ये आलेल्या कोरोनाची (Coronavirus in China) साथीने आता सर्व जग व्यापलं आहे. जानेवारी महिन्यात ही साथ सुरु झाली होती. त्याची माहिती चीनने जगाला दिली नाही असा आरोप वारंवार केला जातो. हाच खोटारडेपणा चीनने भारतासोबतही केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.परराष्ट्र मंत्रालयाच्या समितीसमोर ही माहिती देण्यात आल्याचं उच्चस्तरीय एका वृत्तपत्राच्या सूत्रांनी सांगितलं.

  1. लडाखजवळच्या सीमेवर केलेही घुसखोरी, बोगस पीपीई किटचा पुरवढा अशा अनेक प्रकरणात चीनचा खोटारडेपणा उघड झाला आहे.हा साथीचा आजार आहे आणि तो झापाट्याने पसरू शकतो याची चीनला माहिती होती. मात्र चीनने जगापासून ती जाणीवपूर्वक लपवून ठेवली या आरोपाला यामुळे पुष्टी मिळत असल्याचा दावाही केला जात आहे.

देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या 15 लाखांवर गेली आहे. त्यामुळे भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. भारतानंतर अमेरिक (America) आणि ब्राझिलमध्येच (Brazil) कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. तर देशात आत्तापर्यंत 34 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

सर्व जगभर हा आजारो पसरावा असं चीनला वाटत होतं त्यामुळेच त्यांनी माहिती दडवून ठेवली असाही आरोप केला जातो. आंतरराष्ट्रीय संकेतानुसार असं काही घडण्याची शक्यता असेल तर त्याची माहिती जगाला जेणं बंधनकारक आहे. पण चीनने ते संकेत पाळलेले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here