WhatsApp अपडेट करीत राहा ! आता तुमचं एकच अकाऊंट अनेक ठिकाणी चालणार… काय आहे व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन फीचर?

0

नवी दिल्ली l व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते सातत्याने युजर्ससाठी भन्नाट फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच युजर्सना एक अकाऊंट हे मल्टीपल डिव्हाईसमध्ये एकाच वेळी वापरता येणार आहे. सर्वात प्रसिद्ध इंस्टंट मेसेजिंग सर्विस व्हॉट्सअॅप खूप सारे नवीन फीचर्स युजर्ससाठी आणत आहे. तसेच नवीन फीचर्सची टेस्टिंग बीटा व्हर्जन मध्ये केल्यानंतर सर्व युजर्ससाठी आणत आहे. व्हॉट्सअॅमध्ये कोणते नवीन फीचर्स आले. याची माहिती युजर्संना अपडेट केल्यानंतर कळते. मेसेजिंग प्लॅटफॉर्म मोबाइल अॅपशिवाय डेस्कटॉप व्हर्जन वर सुद्धा काही फीचर्स टेस्ट केले जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच आलेल्या 6 बगला फिक्स केले होते. व्हॉट्सअ‍ॅपने ही समस्या दूर करून याची माहिती एक सिक्योरिटी अ‍ॅडव्हायझरी वेबसाइटवर जारी केली होती. या ठिकाणी युजर्सला अ‍ॅपच्या सिक्योरिटी अपडेट्ससाठीची एक पूर्ण यादी मिळणार आहे.व्हॉट्सअ‍ॅप नवीन वेबसाईट द्वारे ज्या काही कमतरता आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अ‍ॅप कम्यूनिटीततील कमतरता ट्रॅक करण्यासाठी एक ठिकाण असायला हवे. कारण व्हॉट्सअ‍ॅप नवीन व्हर्जनसोबत रिलीज नोटमध्ये सिक्योरिटी रिकमंडेशन जारी करण्यास नेहमी सक्षम नाही होत असं कंपनीने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ग्रुप्स कॉलसाठी वेगळे रिंगटोन
पुढच्या अपडेट्समध्ये व्हॉट्सअॅप युजर्सला ग्रुप कॉल्ससाठी वेगळे रिंगटोन सेट करण्याचा ऑप्शन मिळू शकतो. याप्रमाणे युजर्स कॉल आल्यानंतर विना फोन पाहता समजू शकतील की, हे ग्रुप कॉल आला आहे.

व्हॉट्सअॅप डूडल्स
सुरुवातीला व्हॉट्सअॅप डूडल्स केवळ डेस्कटॉप किंवा वेब व्हर्जनवर मिळत होते. परंतु, फ्यूचर अपडेट्स नंतर मेसेजिंग अॅप अँड्रॉयड व्हर्जनसाठी बॅकग्राउंड डूडल्स घेऊन येवू शकते.

नवीन कॉलिंग यूआय
पुढील अपडेटसोबत नवीन चांगला कॉल्स इंटरफेस पाहायला मिळू शकते. यानंतर कॉल बटन खाली मूव्ह केले जावू शकते. कॉल इंटरफेस मध्ये इन्फो बटन्स ऑडियो बटन आणि व्हिडिओ बटन व्हिडिओ बटन सुद्धा कॅमेरा आणि मेसेजिंग बटनसोबत दिसेल.

अॅनिमेटेड स्टिकर्स
व्हॉट्सअॅपवर चॅटिंग एक्सपिरियंन्स आणखी चांगले करण्यासाठी युजर्संना लवकरच अॅनिमेटेड स्टीकर्स मिळू शकते. कंपनी या स्टीकर्सला टेस्ट करीत आहे. खूप मेसेजिंग अॅप्समध्ये आधी हे फीचर मिळत होते.

शॉर्टकट कॅटलॉग अॅक्सेस
व्हॉट्सअॅप बिजनेस अकाउंटवर युजर्सला कॅटलॉग फीचरचे शॉर्टकट अॅक्सेस मिळू शकते. याप्रमाणे पोर्टफोलियो पाहिले जावू शकते. तसेच नवीन कॉलिंग बटन सुद्धा या फीचरला आणखी चांगले करीत दिले जावू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here