नाशिक – ५४,००० हजार रुपयांचे कांदा बियाणे उगवलेच नाही !

0

वेगवान न्यूज / गणेश सोनवणे

सटाणा l बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथील शेतकऱ्यांचा आरोप सदोष बियाणे अदोष असल्याचा.

एका वेळी सोने मिळेल पण कांदा बियाणे मिळणार नाही अशी परीस्थिती कांदा बियाण्यांची आज असतांना बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथील एका शेतकऱ्याने तब्बल ५४ हजार रुपयांचे १२ किलो कांदा बियाणे खरेदी केले व योग्य त्या काळजीपूर्वक पद्धतीने शेतातही टाकले मात्र पंधरा दिवस उलटून देखील ते उगवलेच नाही.

दिलीप मोतीराम ठाकरे या शेतकऱ्याने चार हजार पाचशे रुपये प्रतिकिलो दराने १२ किलो बियाणे सध्याच्या सर्वात महागड्या एका नामांकित कंपनीकडून कांदा बियाणे खरेदी करून ३० सप्टेंबर रोजी आपल्या शेतात टाकले होते मात्र त्यानंतर आज पंधरा ते विस दिवस उलटून देखील बियाणे उगवलेच नाही आणि १० टक्के उगवले तेही दोन दिवसात मेले त्यामुळे पुढील संपूर्ण वर्षाचे शेतीचे नियोजन चुकून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.तर सदरचे बियाणे निकृष्ट दर्जाचे निघाले असून संबंधित कंपनी वर कायदेशीर कार्यवाही करून माझ्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

चालू वर्षी मोठ्या प्रमाणात कांदा बियाण्याचा तुटवडा सुरु असताना अनेक बियाणे उत्पादक कंपनीकडून अवाच्या सव्वा भावात बियाण्यांची विक्री केली जात आहे. आणि शेतकऱ्यांपुढे मिळेल त्या किमतीत बियाणे खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने ती खरेदीही केली जात आहे मात्र, अनेक कंपन्याच्या बियाणे उगविण्याची क्षमता खूप कमी आहे असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here