नाशिक शहरात आज किती कोरोना पाॅझिटिव्ह तर किती रुग्णांचा मृ्त्यू

0

नाशिकः नाशिक शहरात कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही. नाशिक शहरात रोज कोरोना बाधितांचा आकडा शतकाच्या जवळ जाते आहे.

आज नवीन 91 रुग्ण सायंकाळी सहा वाजेच्या सुमारात असल्याचे अहवालातून समोर असुन आता शहरातील रुग्णांचा आकडा झाला आहे. गुरुवारी (दि.23) रोजी 8, बुधवारी (दि.24) रोजी 1, गुरुवारी (दि.25) रोजी 4 आणि आज (दि.26) रोजी 10 अशाप्रकारे करोना बाधीचा सलग होणार्‍या मृत्युमुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दहा दिवसात 51 करोना बाधीतांचा मृत्यु झाला आहे.

शहरात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे १६९३ वर शहरातील बाधितांची संख्या पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत नाशिक शहरात ६६० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत तर ९४५ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.शहरातील वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे १९३ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र वाढले आहेत.

आज नाशिक मनपा हद्दीत दिवसभरात ९१ रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत. तर दहा बाधित रुग्णांचा आज मृत्यूदेखील झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here