ज्याचं विमान पाडलं त्याला भारताने हिरो बनवलं

0

वृत्तसंस्था

काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीर भागात मदतकार्यादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे आफ्रिदी चर्चेत आला होता.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जातो.

यानंतर पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीशी बोलत असताना शाहिद आफ्रिदीने, भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदनचा उल्लेख करत भारतावर बोचरी टीका केली आहे.तो म्हणाला की,

सीमेपलीकडून आमचा एक भाऊ विमानाने आला होता, त्यालाही आम्ही चहा पाजला आणि सन्मानाने घरी पाठवलं. ज्याचं विमान आपण पाडलं आणि त्याला ताब्यात घेतलं, भारतीयांनी त्याला हिरो बनवलं. यापेक्षा अधिक आपण काय करु शकतो?? भारतानेही एक-दोन पावलं पुढे टाकण्याची गरज आहे. आम्हीही माणसं आहोत, त्या अनुषंगाने चर्चा झाली पाहिजे.” असे शाहिद म्हणाला…

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here