रघुवंशी मिलमध्ये भीषण आग, लोअर परेल परिसरातील घटना

0

मुंबई : .रघुवंशी मिलमधील एका शोरुमला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, आगीमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लोअर परेलच्या रघुवंशी मिलमध्ये ही भीषण आग लागली आहे . या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.

मिलमध्ये अनेक कॉर्पोरेट ऑफिस आहेत. याशिवाय अनेक वेगवेगळे दुकानं आणि शोरुम आहेत. रघुवंशी मिलमधील एका इमारतीत असणाऱ्या शोरुमला ही आग लागली. ही इमारत बाहेरुन काचेची आहे. त्यामुळे अग्निमशमन दलाचे जवान काच फोडून इमारतीत शिरले.

शिवसेना नेत अरविंद सावंत हे आता घटनास्थळी दाखल झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here