भारतात 24 तासात 18 हजार 522 कोरोना रुग्ण,४१८ जणांचा मृत्यू

0

नवी दिल्लीः

देशभरात चोवीस तासांत करोनामुळे ४१८ जणांचा मृत्यू झाला असून, १८ हजार ५२२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ६६ हजार ८४० वर पोहचली आहे. सध्या २ लाख १५ हजार १२५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत करोनामुळे देशभरात एकूण १६ हजार ८९३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशभरात ३ लाख ३४ हजार ८२२ जणांनी करोनावर मात केली आहे. २९ जूनपर्यंत देशभरात एकूण ८६ लाख ८ हजार ६५४ नमूने तपासणी करण्यात आली आहे. यातील २ लाख १० हजार २९२ नमूने काल तपासले गेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here