नाशिक – देवळा तालुक्यात पुन्हा एकाला कोरोनाची बाधा l तालुक्याचा आकडा 9 वर

0

वेगवान न्यूज /मनोज वैद्य
दहिवड l देवळा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून आताच तालुका प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात सरस्वतीवाडी येथील २७ वर्षीय युवकास कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी प्रबंधभूमीला दिली आहे.
खर्डे,दहिवड व सरस्वतीवाडी येथील प्रत्येकी एक संशयित रुग्ण चांदवड येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरला उपचार घेत होते तेथून त्यांच्या घशाचे स्त्राव तपासणी पाठविण्यात आले होते यादरम्यान सरस्वतीवाडी येथील संशयित २७ वर्षीय युवकास अधिक त्रास जाणवू लागल्याने मंगळवारी नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

खर्डे,दहिवड व सरस्वतीवाडी येथील तिघंही संशयित रुग्णांचे प्रलंबित असलेले कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये खर्डे,दहिवड येथील संशयित रुग्ण निगेटिव्ह तर सरस्वतीवाडी येथील २७ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आला असून हा युवक नाशिक येथे एका खाजगी कंपनीत कामाला असल्याचे समजते.

दि.२८ रविवारी देवळा शहरात एक व खुंटेवाडी येथे एक तसेच दि.३० मंगळवारी गुंजाळनगर येथे एक व देवळा शहरात पाच रुग्ण आढळून आले होते आणि आता पुन्हा एक रुग्ण आढळून आल्याने कोरोनाने देवळा तालुक्यात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे.

सरस्वतीवाडी येथील रुग्णाचे घर केंद्रबिंदू मानून कंटेन्मेंट आणि बफर झोन म्हणून घोषित करण्यात येणार आहे.याठिकाणी आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असून बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना देवळा येथील कोविड केअर सेंटरला दाखल करण्यात येणार आहे.

त्यामूळे आता तालुक्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ९ वर जाऊन पोहचली असून यामध्ये देवळा शहरातील ६,खुंटेवाडी येथील १,गुंजाळनगर येथील १ व सरस्वतीवाडी येथील १, अशा एकूण ९ कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली असून देवळा तालुक्याच्या चिंतेत भर पडली आहे तसेच ३५ रिपोर्ट येणे बाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here