24 तासांत देशात कोरोना एवढा वाढला

0

नवी दिल्ली, 28 जून :

देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोरोनाच्या आकड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दररोज कोरोनाचे नवीन रेकॉर्ड समोर येत आहेत. देशात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. आताही गेल्या 24 तासांत सुमारे 20 हजार कोरोनाची नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहे. तर या दरम्यान 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशभरात आतापर्यंत कोरोना रुग्णाचा एकूण आकडा 5,28,859 वर पोहोचला आहे. मागच्या 24 तासांमध्ये 19,906 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. या वाढत्या आकड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आतापर्यंत देशा 203051 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर 309713 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या जीवघेण्या महामारीमुळे आतापर्यंत देशात 16095 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

मागच्या एका दिवसाता देशभरात 231095 जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. याआधी एका दिवसांत 220479 लोकांची चाचणी करण्यात आली होती. देशात तर कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. पण महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णांचा आकडा सगळ्यात जास्त आहे.

राज्यामध्ये 159133 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये 67615 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर 84245 रुग्णांनी कोरोनावर मात करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 7273 रुग्णांचा महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात परवानगी मिळूनही सलुन चालु होणार नाही

कोरोनाच्या हाहाकारामध्ये दिल्ली दुसर्‍या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 80188 लोक कोरोनाची झुंज देत आहेत. त्यातील 2558 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत अजूनही 28329 सक्रिय केसेस आहेत. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 78335 कोरोना प्रकरणे आहेत. इथे कोरोना विषाणूमुळे 1025 जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, वर्ल्डडोमीटरच्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 कोटीहून अधिक झाल्याची नोंद करण्यात आली. उन्हाळ्यात कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण कमी होईल असा अनुमान लावण्यात आला होतं. मात्र हे अनुमान चुकीचं निघाल्याचं सांगितलं जात आहे. मे आणि जून महिन्यात कोरोनाचे सर्वात जास्त 67 टक्के रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये जगभरात दरदिवशी सरासरी 1 लाख 35 हजार नवीन रुग्ण समोर येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here