त्वरीत पबजी सह ८९ अ‍ॅप्स तात्काळ काढून टाकण्याचा आदेश

0

नवी दिल्लीः

भारत -चीनचे संबंध ताणले गेल्यामुळे भारतीय नागरिकांना बरोबर सुरक्षा विभाग सतर्क झाला आहे. हा तणाव महागात पडू नये म्हणून  गोपनीय माहितीच्या सुरक्षेवरुन भारतीय लष्कराने जवानांना मोबाइलमधून ८९ अ‍ॅप्स तात्काळ काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. १५ जुलैपर्यंत अ‍ॅप्स काढून टाकावीत असे निर्देश भारतीय लष्कराने अधिकारी, जवानांना दिले आहेत.

टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम तसंच पबजीचाही समावेश आहे. भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी संवेदनशील आणि गोपनीय माहिती चोरी होण्याची शक्यता असल्याने हा आदेश देण्यात आला आहे.भारतीय लष्कराकडून यासंबंधी आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.

यामध्ये लष्कराने टिंडरसारखे अ‍ॅपदेखील डिलीट करण्यास सांगितलं आहे. याशिवाय काऊचसर्फिंग आणि बातम्यांसाठी वापरलं जाणारे डेलीहंट हे अ‍ॅपही डिलीट करण्यास सांगण्यात आलं आहे.व्हॉट्सअ‍ॅप, टेलीग्राम, सिग्नल, युट्यूब, ट्विटर यांचा वापर करण्यासाठी अधिकारी आणि जवानांना परवानगी आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा लष्कराने दिला आहे. याआधी भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय जाहीर केला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here