‘सुशांत जिवंत असता तर…’ सोनू सूदचा नाव न घेता कंगनावर पुन्हा निशाणा !

0

मुंबई l सुशांतचा मृत्यू आता एक गंमत बनून राहिलीय. काही लोक या त्याच्या मृत्यूचा पर्सनल फायदा उठवत आहेत.असे बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

लॉकडाऊनपासून सर्वात जास्त चर्चेत राहिलेला अभिनेता सोनू सूदही यावर नाराज आहे. त्यानेही अशीच भावना व्यक्त केली की, सुशांतच्या मृत्यूच्या विषयाला आता वेगळंच वळण देण्यात आलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने एका न्यूज पोर्टलच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार सोनू सूद म्हणाला की, ‘जर आज सुशांत सिंह राजपूत जिवंत असता तर त्याच्या नावाने सुरू असलेली सर्कस पाहून हसला असता. प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे की, यात शेवटी काय होणार आहे.

जे लोक कधी सुशांतला भेटले सुद्धा नाहीत ते समोर येऊन त्याच्याबाबत बोलत आहेत. हे लोक केवळ प्रकाशझोतात येण्यासाठी असं करत आहेत’.याबाबत सोनू पुढे म्हणाला की, तो सुशांत सिंह राजपूतला अनेकदा भेटला होता. इतकेच काय तर सुशांत आणि सोनू सोबत जिममध्ये वर्कआउटही करत होते.

सोनू सूदने याआधीही कंगनावर नाव न घेता निशाणा साधला आहे. तो म्हणाला होता की, जे लोक सुशांतला कधी भेटले नाहीत ते त्याच्याबाबत बोलत आहेत.

बाहेरून येऊनही सुशांतने फार कमी वेळात खूप काही मिळवलं होतं. सोनू म्हणाला की, सुशांत कदाचित त्या लोकांवर हसला असता जे आता त्याचे प्रवक्ता बनून फिरत आहेत. तर दुसरीकडे सुशांतच्या परिवारातील लोक शांतपणे घरी बसले आहेत.सोनू म्हणाला की, एका काळानंतर लोक सुशांतला विसरू लागतील आणि त्यानंतर सुशांतसाठी आरडाओरड करणाऱ्या लोकांना नवा टॉपिक मिळेल. ज्यावर ते त्यांना कुणीही न मागितलेला सल्ला देत बसतील. आजकाल जे घडत आहे ते बघून वाईट वाटतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here