जर शाळा सुरू केल्या नाही तर शाळांना देण्यात येणारा निधी रोखण्यात येईल-ट्रम्प

0

वृत्तसंस्था

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. जर शाळा सुरू केल्या नाही तर शाळांना देण्यात येणारा निधी रोखण्यात येईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी आखून दिलेली मार्गदर्शक सूचना अधिक कठोर असल्याची तक्रारही डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यांच्या या तक्रारीनंतर काही वेळातच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी एक मोठी घोषणा केली.

तसंच करोनाच्या नियंत्रणासाठी आणि करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील आठवड्यात नवी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार असल्याचंही माईक पेंस यांनी सांगितलं.

आतापर्यंत १ लाखांपेक्षा अधिक लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.अमेरिकेत सध्या ३१ लाखांपेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर न्यूयॉर्कसारख्या शहरातच ४ लाख करोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here