ब्रेकिंग – गणेशोत्सवादिवशी ISIS दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला ! स्फोटकांसह दहशतवादी ताब्यात

0

नवी दिल्ली l गणेशोत्सवादिवशी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. गुप्तचर यंत्रणेकडून यासंदर्भात माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलीस यंत्रणा सतर्क होती आणि त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं.देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह साजरा होत असताना मोठं विघ्न टळलं आहे. दिल्लीतील धौली कुआँ रिंग रोड परिसरात एन्काऊंटर सुरू आहे.

दिल्लीत सकाळीच एन्काऊंटर सुरू झाला आणि या एन्काऊंटरदरम्यान ISISचा एक दहशतवादी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. स्पेशल सेल टीम अद्याप ही कारवाई करत आहे. या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात IED स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here