अभिनेता अक्षय कुमारचं हॅलिकॅाप्टर उतरलं कसं….

0
संग्रहीत फाईल

मुंबईः

अभिनेता अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आला होता त्यामुळे अक्षय कुमारचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत

हाती आलेल्या माहितीनुसार अभिनेता अक्षय कुमार हॅलिकॉप्टरने दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आला होता. त्रंबकेश्वर रोडवरील सपकाळ नॉलेजच्या हेलिपॅडवर त्याचं हेलिकॉप्टर उतरलं होतं. तसेच ग्रेप काउंटी रिसॉर्टमध्ये तो वास्तव्यास होता. अक्षय कुमारला या दौऱ्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून सुरक्षा मिळाली होती.

नाशिकमध्ये मार्शल आर्ट अॅकेडमी किंवा निसर्गोपचार केंद्र सुरु करण्याच्या उद्देशानं पाहणी करण्यासाठी अक्षय कुमारने नाशइक दौरा केला आहे.

अभिनेता अक्षय कुमार याच्या नाशिक दौऱ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हेलिकॉप्टरला उतरण्याची परवानगी, टाळेबंदीत रिसॉर्टमधील वास्तव्य यामध्ये काही गैर घडले असेल तर चौकशी केली जाईल, असे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here