breadcrumb-details

लासलगावी व्हेंटिलेटर बेड सह रेमडीसीविरचा तुटवडा...

Gallery

लासलगावी व्हेंटिलेटर बेड सह रेमडीसीविरचा तुटवडा...

वेगवान न्यूज / समीर पठाण
11 April 2021 12:47 PM

लासलगाव l निफाड तालुक्यात कोरोना आजारावर उपचार करण्याऱ्या रेमडीसीविरचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. रुग्णांचे नातेवाईक अनेक ठिकाणी फक्त रेमडीसीवर इंजेक्शन साठी फिरतांना दिसत आहे.निफाड तालुक्यामध्ये दररोज २०० हुन अधिक रुग्ण सापडत आहे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने छोट्या दवाखान्यापासून ग्रामीण रुग्णालय,खाजगी हॉस्पिटल हाऊसफुल झाले आहे.वाढत्या कोरोना रुग्णामुळे रुग्णालयामध्ये खाटांची कमतरता भासत आहे.तर व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नसल्याने कोरोना ग्रस्त रुग्णांचे नातेवाईक तणावात आलेले आहे.रुग्णांचे नातेवाईक अनेक ठिकाणी फक्त रेमडीसीवर इंजेक्शन साठी फिरतांना दिसत आहे.

 

निफाड तालुक्यामध्ये दररोज २०० हुन अधिक रुग्ण सापडत आहे कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने छोट्या दवाखान्यापासून ग्रामीण रुग्णालय,खाजगी हॉस्पिटल हाऊसफुल झाले आहे.वाढत्या कोरोना रुग्णामुळे रुग्णालयामध्ये खाटांची कमतरता भासत आहे.तर व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होत नसल्याने कोरोना ग्रस्त रुग्णांचे नातेवाईक तणावात आलेले आहे.

 

संपूर्ण राज्याला कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असताना नाशिक जिल्ह्यात त्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे.निफाड तालुक्यातील लासलगाव परिसरातून येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मात्र वैद्यकीय सुविधा या तोकड्या स्वरूपात जाणवू लागल्याने रुग्णांची परवड होताना दिसत आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

गेल्या काही दिवसापासून कोरोना ची संख्या सातत्याने वाढत आहे परिसरातील सर्व सरकारी व खाजगी रुग्णालयात खचाखच गर्दी दिसून येत आहे रुग्णालयात पेशंट दाखल करतानाच बेड शिल्लक नसल्याने व ऑक्सिजन नसल्याने दाखल करून घेण्यास हॉस्पिटल नकार देत आहे.एकीकडे रुग्णांची संख्या सशाच्या गतीने वाढत असताना दुसरीकडे मात्र लसीकरण मात्र सरकारकडून कासवगतीने होत आहे. लासलगांव परिसरासाठी खडकमाळेगाव व निमगाव वाकडा आरोग्य केंद्र तसेच लोटस हाॅस्पीटल येथे लसीकरण होते मात्र येथे लस ऊपलब्ध होत नसल्याने लसीकरण वेग फारच कमी आहे.

 

वाढत्या कोरणाच्या प्रादुर्भावामुळे निफाडचे प्रांत अर्चना पठारे यांनी १९ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केली असली तरी या गावातील नागरिक सर्रास गावाचा बाहेर फिरताना दिसत असल्याने कोरोना कसा आटोक्यात आनणार असा प्रश्न पडलेला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व संसर्ग थांबवण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला होता आता संपूर्ण जिल्हा अत्यावश्यक सेवा वगळता ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.प्रशासनाला नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची गरज आहे जेणेकरुन कोरोनाला अटकाव घालण्यास मदत होणार आहे

 

.....चौकट......

 

प्रतिक्रिया

 

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे रेमडेसिविर चा तुटवडा काही प्रमाणात जाणवत आहे याचा काही प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे ऐकिव आहे, मात्र जिल्हाधिकारी नाशिक यांनी आदेश दिला आहे की कोविड सेंटरने मागणी केल्यास त्यांना तेथे डायरेक्ट पुरवठा केला जाईल.येणाऱ्या काळात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यावर आमचा भर राहील.लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बरोबरचं उपकेंद्रात ही लस लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आमचे प्रयत्न चालू आहे.

 

बाळासाहेब क्षीरसागर (जि.प.अध्यक्ष, नाशिक).