breadcrumb-details

लासलगाव येथील कांद्याच्या खळ्यास भीषण आग

Gallery

लासलगाव येथील कांद्याच्या खळ्यास भीषण आग

वेगवान न्यूज / समीर पठाण
09 April 2021 06:22 PM

लासलगाव(वार्ताहर)समीर पठाण

 

लासलगाव येथील कांदा निर्यातदार व्यापारी कांतीलाल सुराणा यांचे लासलगाव-विंचूर रोड वर साईबाबा ट्रेडर्स हे कांद्याचे मोठे खळे असून त्या ठिकाणी ठेवलेले लाखो रुपयांचे बारदान व कागदपत्रे आगीत जळून खाक झाल्याची घटना काल शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली.ही आग इतकी भीषण होती की धुराचे मोठमोठाले लोळ उठत होते.

 

या वेळी मजूर वर्गाला लाखोंचे बारदान आगीच्या तोंडातून वाचवण्यात यश आले.आग लागली त्यावेळी मोठ्या संख्येने मजूर वर्ग त्या ठिकाणी काम करत होते.ही आग लागल्याचे समजताच मजूर वर्गाने पळ काढल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही,दरम्यान आग कशामुळे लागली हे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

 

लासलगाव येथे अग्निशमन दलाची गाडी नसल्यामुळे आग लवकर आटोक्यात येत नसल्याने लासलगाव येथून जवळच तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगाव बसवंत आणि येवला येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.लासलगाव विंचूर हा रस्ता कायम वर्दळीचा असल्यामुळे या ठिकाणी बघ्यांची गर्दी जास्त प्रमाणात असल्याने ही बातमी वाऱ्यासारखी लासलगाव व परिसरात पसरली.दरम्यान आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे.