breadcrumb-details

नाशिक - देवळा तालुक्यात कोरोनाचा मृत्यूदर वाढला; पती पत्नी पाठोपाठ बाप व दोन लेकांचा मृत्यू

Gallery

नाशिक - देवळा तालुक्यात कोरोनाचा मृत्यूदर वाढला; पती पत्नी पाठोपाठ बाप व दोन लेकांचा मृत्यू

वेगवान न्यूज / मनोज वैद्य
08 April 2021 06:54 PM

दहिवड (८ एप्रिल) देवळा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत असतांना मृत्यदर ही वाढतांना दिसून येत आहे. बुधवारी पिंपळगाव (वा.) येथील पती पत्नीच्या मृत्यूनंतर गुंजाळनगर येथील बाप व दोन लेकांचा कोरोनामूळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

बुधवारी पिंपळगाव (वा.) येथील पांडुरंग विठ्ठल आहेर व त्यांच्या पत्नी किसनाबाई पांडुरंग आहेर यांचा काही तासांच्या अंतराने एकाच दिवशी मृत्यू झाला होता. त्यानंतर गुंजाळ नगर येथील प्रगतिशील शेतकरी प्रभाकर दगा गुंजाळ कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाच त्यांचे वडील दगा शामभाऊ गुंजाळ हे उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. कुटुंबातील कर्त्या व्यक्तींच्या निधनाचे दुःख पचवीत असतानाच नासिक येथे वास्तव्यास असलेल्या भाऊसाहेब दगा गुंजाळ त्यांच्यावर नासिक येथे उपचार सुरू असताना त्यांचेही निधन झाले. एकाच कुटुंबातील तीन कर्त्या व्यक्तींचा लागोपाठ मृत्यू झाल्याने देवळा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झपाट्याने होत असताना व प्रत्येक गावात कोरोनामूळे मृत्यू होत असतानाही नागरिक बेफिकीर वागत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.