breadcrumb-details

नाशिक - टरबूजाला कवडीमोल दर मिळत असल्याने टरबूज फेकले रस्त्यावर

Gallery

नाशिक - टरबूजाला कवडीमोल दर मिळत असल्याने टरबूज फेकले रस्त्यावर

वेगवान न्यूज / समीर पठाण
07 April 2021 12:53 PM

लासलगाव l प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून शेती व्यवसायास आर्थिक फटका बसत आहे. निफाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूज यासह भाजीपाल्याची लागवड केली होती.निसर्गानेही पीक चांगले दिले.परंतु ऐन टरबूज काढणीला आले अन् पुन्हा कोरोनाने थैमान घातले.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.यामुळे टरबूज उत्पादक कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहे.निफाड तालुक्यातील मरळगोई येथील एका शेतकऱ्यांने टरबूजला कवडीमोल भाव मिळत असल्याने रस्त्याच्या कडेला टरबूज फेकून दिले या फेकलेल्या टरबूजावर गाईंनी मनसोक्त ताव मारल्याचे दिसून आले.

 

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत पैसा कमवण्याचा फंडा अनेक शेतकरी अजमावून पाहत असतात तर काहींना फायदा होतो तर काहींना आपला शेतीमाल तोट्यात विक्री करावा लागतो.असंच काही सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध तर काही ठिकाणी लॉकडाउन जन्य परिस्थिती निर्माण झाल्याने याचा परिणाम शेतीपिकांवर होत आहे त्यामुळे कांद्यानंतर आता टरबुजच्या बाजार भावाची लाली उतरल्याने उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी खर्चही निघत नसल्याने निफाड तालुक्यातील मरळगोई येथील एका शेतकऱ्यांने टरबूज रस्त्याच्या कडेला फेकून दिले या फेकलेल्या टरबूजावर गाईंनी मनसोक्त ताव मारल्याचे दिसून आले.