breadcrumb-details

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, शेडगाव चौरस्ता येथील घटना

Gallery

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, शेडगाव चौरस्ता येथील घटना

वेगवान न्यूज / अमोल झाडे
05 April 2021 01:15 PM

समुद्रपूर :- 

         तालुक्यातील नागपूर चंद्रपूर मार्गांवरील शेडगाव चौरस्त्या जवळील  हाटेल संतारामच्या काही अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेत आज रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना उघडीस आली आली.

या घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री चांदेवार पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत. वनविभागाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर वनक्षेत्र अधिकारी विजय धात्रक यांना माहिती दिली.

दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थित वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी घटनेचा पंचनामा केला.सदर बिबट अंदाजे २ वर्षा चे असावा त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कानातूनव नाकातून रक्त येत होते वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर व विजय धात्रक यांनी  पंचनामा करून उत्तरीय तपासणी करिता आजदा रोपवाटिकेत आणण्यात आले.

यावेळी पशु संवर्धन अधिकारी डॉ स्मिता मुडे, वनरक्षक योगेश पाटील , उमेश बावणे वाहन चालक अनिल जुमडे उपस्थित होते सदर बिबट हा सहा महिन्यां अगोदर आजदा पाटीवर किशोर दिघे यांचे कार ला आडवा गेल्याची तेव्हा माहिती मिळाली होती तोच बिबट्या असावा  पुढील तपास वन अधिकारी करीत आहे.