breadcrumb-details

सिन्नर:रिक्षाचालकाला मारहाण करत मोबाईल व रोख रकमेसह रिक्षा घेऊन चोरटे पोबारा...

Gallery

सिन्नर:रिक्षाचालकाला मारहाण करत मोबाईल व रोख रकमेसह रिक्षा घेऊन चोरटे पोबारा...

वेगवान न्यूज / शरद शेळके
03 April 2021 06:50 PM

        सिन्नर 

      तालुक्यातील माळेगाव एमआयडीसी येथील एल अँड टी फाट्याजवळ पल्सर मोटार सायकल वर आलेल्या 3 व्यक्तीनीं रिक्षा अडवून चालकास मारहाण करीत मोबाईल व रोख रकमेसह रिक्षा घेऊन पसार झाल्याची घटना शनिवार दि 3 ला पहाटे च्या सुमारास घडली

नाशिकरोड रेल्वेस्टेशन जवळील सातपीरबाबा रिक्षा स्टँड मधील रशीद पठाण यांची रिक्षा क्रमांक MH 15 FU 0424 ही चालक नासिर युनूस खान रा. नाशिकरोड राजवाडा देवळाली गाव हे नाशिकरोड रेल्वे स्टेशन वरून पहाटे 5 वाजेच्या सुमारास सिन्नर कडे येत असताना माळेगाव एमआयडीसी येथील एल अँड टी फाट्याजवळ मोटार सायकल वर वरुन आलेल्या तिघांनी गाडी आडवी टाकत चालक खान यांना मारहाण करून त्यांनी घातलेले जर्किंग काढून घेतले व खाकी शर्ट मधील वरचा खिशातील 1500 - ते 1600 रुपयेची रक्कम काढून घेतली व रिक्षा घेऊन पसार झाले. खान त्यांनी नाशिकरोड रिक्षा मालक पठाण व रिक्षा चालक आपले सहकारी याना माहिती सांगितली ते तात्काळ नाशिक रोड हुन सिन्नरला सकाळी 7.30 ते 10 वाजे पर्यंत मुसळगाव midc येतील पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवण्या साठी गेले होते परंतु पोलीस अधिकारी नसल्यामुळे रिक्षाचालक सहकारी यांना लवकर पोलीस प्रकाशासनाकडून सहकार्य मिळाले नसल्याची माहिती या वेळी रिक्षा चालकांनी दिली यामध्ये खान जखमी झाले त्यांच्या वर सिन्नर नगर पालिका दवाखान्यात उपचार सुरू आहे सकाळी10 नंतर पोलीस अधिकारी दशरथ चौधरी हे कर्मचाऱ्यांसोबत सिन्नर नगर पालिका दवाखाना येथे येऊन रुग्ण खान यांचा जबाब घेण्यात आला.