breadcrumb-details

धक्कादायक : १० लाखांच्या खंडणीसाठी ट्रक चालकासह क्लीनरचे अपहरण : दोन आरोपी गजाआड

Gallery

धक्कादायक : १० लाखांच्या खंडणीसाठी ट्रक चालकासह क्लीनरचे अपहरण : दोन आरोपी गजाआड

वेगवान न्यूज / मनोज वैद्य
03 April 2021 04:05 PM

दहिवड (३ एप्रिल) l भिवंडी येथून माल भरून मालेगाव कडे येत असतांना मालट्रक क्रं (एम.एच. १२, एफ. झेड ८२८२) चांदवड घाटाचे खाली चिंचवे ता.देवळा येथील गावाचे परिसरात ग्रे कलरचे स्कार्पिओ गाडीतुन चार संशयित आरोपी आले व ट्रक अडवुन पोलीस असल्याची बतावणी करुन फिर्यादी ट्रक चालक अब्दुल्ला फैसल सिराज अहमद (२५) रा.मालेगाव ता.मालेगाव व साक्षीदार क्लिनर बशीर शेख रुस्तम यांना बळजबरीने स्कार्पिओ गाडीत टाकुन अपहरण करुन पळवुन नेवुन त्यांना जिवे मारण्याची धमकी देवुन साक्षीदार बशीर शेख यास हाताचापटीने मारहाण करुन माल मालक व फिर्यादीचे वडील यांचे कडे फिर्यादी व साक्षीदार बशीर शेख व ट्रिक सोडविणे साठी दहा लाख रुपयाची खंडणीची मागणी केली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.ही घटना २ एप्रिल रोजी सकाळी साडे पाच वाजता घडली होती.

 

याप्रकरणी अपहरण करणारे संशयित आरोपी वसीम शेख,शाबीर शेख,शाबीर अन्सारी,नाजीम कबुतर यांच्याविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ३६४ अ, ३८७, १७०, ३२३, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार पोलीस त्यांचा शोध घेत होते.

 

यातील क्लीनर, माल ट्रक व दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने ताब्यात घेतले असून घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर,पोलिस उपअधीक्षक भोसले,देवळा पोलीस निरीक्षक सुहास देशमुख साहेब यांनी भेट दिली याबाबत पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर करित आहेत.