breadcrumb-details

साडे चार किलो गांजा बाळगल्या प्रकरणी मजुर आरोपीची जामीनावर सुटका...

Gallery

साडे चार किलो गांजा बाळगल्या प्रकरणी मजुर आरोपीची जामीनावर सुटका...

वेगवान न्यूज / समीर पठाण
03 April 2021 11:12 AM

लासलगाव l अहमदनगर येथील एका संशयित मजुरावर साडे चार किलो गांजा बाळगल्या प्रकरणी पणजी येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता.या प्रकरणी आरोपींच्या वकिलांनी मा.न्यायालायाच्या सदर प्रकरण लक्षात आणून दिल्या नंतर मा.पणजी जिल्हा व सत्र न्यायालायाने आरोपीची ५० हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर सुटका केली

 

या बाबत सविस्तर माहिती अशी की दी. ४ मार्च २०२१ रोजी क्राईम ब्रांच रायबंदर पोलीस स्टेशन यांनी पणजी येथे एका संशयीतावर(रा.भिंगार,अ.नगर)धाढ मारून साडे चार किलो गांजा जप्त केल्यानंतर त्याच्यावर एन डी पी एस ॲक्ट १९८५,कलम २०(ब )(२ )ब अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता त्यानंतर आरोपीला तपासाकामी म्हापसा न्यायालयाने ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.आरोपी तर्फे दि. २२ मार्च २०२१ रोजी पणजी जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. 

 

साडे चार किलो गांजा ने भरलेली बॅग ही आरोपीच्या मित्राने ५-१० मिनट ही बॅग तुझ्याकडे ठेव मी माझे काम करून लगेच परत येतो असे सांगून आरोपीकडे दिली होती व त्यामध्ये गांजा आहे याची तिळमात्र कल्पना आरोपीला नव्हती आणि त्याच बरोबर आरोपी कडून गांजा हस्तगत करण्याची प्रक्रिया ही एन डी पी एस ॲक्ट कलम ५० प्रमाणे न्यायाधिश किंवा गॅझेटएड आधिकऱ्या समोर करणे बंधनकारक असूनही तसे तपास अधिकाऱ्यांनी केले नाही.ह्या बाबी आरोपींच्या वकिलांनी मा.न्यायालायाच्या लक्षात आणून दिल्या नंतर मा.पणजी जिल्हा व सत्र न्यायालायाने आरोपीची ५० हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर सुटका केली.आरोपीच्या वतीने लासलगाव येथील ॲड.रणजित गंगाधर जाधव व ॲड वैभव संजय वाकचौरे यांनी युक्तिवाद केला व त्यास ॲड.विजय वाकळे यांनी सहकार्य केले.