breadcrumb-details

नाशिक - देवळा तालुक्यात एकाची गळफास घेऊन आत्महत्या...

Gallery

नाशिक - देवळा तालुक्यात एकाची गळफास घेऊन आत्महत्या...

वेगवान न्यूज / मनोज वैद्य
02 April 2021 06:48 PM

दहिवड (२ एप्रिल) l मेंढ्या सांभाळत नाही म्हणून अल्पवयीन मुलाला अमानुषपणे मारहाण आणि चटके देऊन अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला सागर तुळशीराम डुकळे (३५) रा. रावळगाव ह. मू. खर्डे (वा.) ता. देवळा याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

 

खर्डे परिसरातील कांचनबारी घाटातील डोंगरावर गुरुवारी (दि. १) रोजी सागर तुळशीराम डुकळे या इसमाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिस पाटलाने दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

 

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपूर्वी लखन बारकू गायकवाड (१०) रा. ललींगबारी, ता. साक्री याला सागर डुकळे याने मेंढ्या चारण्यासाठी ठेऊन घेतले होते. मात्र या अल्पवयीन मुलाला डुकळे याने मेंढ्या सांभाळत नाही म्हणून अमानुषपणे मारहाण व चटके देऊन गंभीर दुखापत केली होती. या घटनेतून त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. मात्र मेंढपाळ व्यावसायिक सागर डुकळे याने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खंडेराव भवर करीत आहेत.