breadcrumb-details

देवळा तालुक्यात आज एकाच दिवशी करोना बाधित रुग्णांनी ठोकली "सेंच्युरी"; अक्टिव्ह रुग्ण संख्या आठशे च्या घरात

Gallery

देवळा तालुक्यात आज एकाच दिवशी करोना बाधित रुग्णांनी ठोकली "सेंच्युरी"; अक्टिव्ह रुग्ण संख्या आठशे च्या घरात

वेगवान न्यूज / मनोज वैद्य
25 March 2021 07:31 PM

दहिवड (२५ मार्च) l देवळा तालुक्यात आज एकाच दिवशी करोना बाधित रुग्णांनी शतक पार केले असून सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल नव्याने ११६ करोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत , अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी दिली.देवळा तालुक्यात दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून प्रशासनाची सर्व यंत्रणा कामाला लागली असली तरी नागरिकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने करोना रुग्ण वाढू लागले आहेत.देवळा तालुक्यात तब्बल ७५९ सक्रिय करोनाचे रुग्ण उपचार घेत असून देवळा शहरासह दहिवड, मेशी, लोहोणेर,उमराणे, गुंजाळनगर, माळवाडी, सरस्वतीवाडी आदी गावे करोनाची "हॉट स्पॉट" बनली आहेत.

 

आतापर्यंत देवळा तालुक्यात दोन हजार १३४ करोनाचे रुग्ण आढळून आले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार ३३८ इतकी आहे तर २७ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देवळा येथील करोना केअर सेंटरला तीन, चांदवड उपजिल्हारुग्णालयात १९, जिल्हा रुग्णालयात पाच, खाजगी रुग्णालयात ३४ तर गृह विलगिकरणात ६९८ असे एकूण ७५९ रुग्ण उपचाराखाली आहेत.नागरिकांनी करोना संक्रमण थोपविण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.सुभाष मांडगे यांनी केले आहे.