breadcrumb-details

नाशिक जिल्ह्यात आता लॅाकडाऊनच होणार, आजचा आकडा इतका भयंकर...

Gallery

नाशिक जिल्ह्यात आता लॅाकडाऊनच होणार, आजचा आकडा इतका भयंकर...

वेगवान न्यूज नेटवर्क
24 March 2021 09:18 PM

 

नाशिक दिनांक 24 मार्च 2021
नांदगाव तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत  कोविड केअर सेंटरची संख्या पाचपटीने वाढविण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनामार्फत आवश्यक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज नांदगाव तालुक्याच्या कोरोना सद्यस्थितीची आढावा बैठकीत दिल्या आहेत.

आज नांदगाव तालुक्यातील कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी येवला प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसीलदार उदय कुलकर्णी, मनमाड उप पोलीस अधीक्षक समरसिंग साळवे, तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ससाणे, मनमाड उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख डॉ. ननावरे, नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. गोसावी, मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. मुंडे आदी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यात आज किती निघाले कोरोना पॅाझिटिव्ह 

दिनांक:  24 मार्च 2021 नाशिक  

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-2224

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ - 3338

नाशिक मनपा-      1849
नाशिक ग्रामीण-     1191
मालेगाव मनपा-     0245
जिल्हा बाह्य-         0053


नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 2262

आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -15
नाशिक मनपा-        10
मालेगाव मनपा-       01
नाशिक ग्रामीण-       03
जिल्हा बाह्य-           01