breadcrumb-details

अबब !इगतपुरी तालुक्यात नवरदेवासह १६ वऱ्हाडी कोरोना बाधित ! ग्रामीण भागात सापडले ३० रुग्ण !

Gallery

अबब !इगतपुरी तालुक्यात नवरदेवासह १६ वऱ्हाडी कोरोना बाधित ! ग्रामीण भागात सापडले ३० रुग्ण !

वेगवान न्यूज / उत्तम गायकर
19 March 2021 11:54 AM

 

इगतपुरी तालुक्यातील एका लग्न सोहळ्यामध्ये नवरदेवासह १६ वऱ्हाडी कोरोना बाधित सापडले आहेत. यामुळे इगतपुरीच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे.

 

आज एकाच दिवसात फक्त इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात जवळपास ३० बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये दोन शिक्षक हे टाकेद बुद्रुक परिसरामध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी गेले असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा मोठा उद्रेक बघायला मिळत आहे.

 

दोन दिवसापूर्वी तालुक्यातील एका विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पुढे आले आहे. विशेष म्हणजे दोन विवाह एकाच वेळेस आयोजित केल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती.

 

त्यामुळे आरोग्य विभागाने लग्न समारंभाला हजेरी लावलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या घरोघरी जाऊन कोरोना टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत वऱ्हाडी पैकी १६ लोक कोरोना बाधित आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.