breadcrumb-details

लता मंगेशकरांना विष दिलं होतं ! माझ्यावर विषप्रयोग कुणी केलाय मला माहिती होतं !

Gallery

लता मंगेशकरांना विष दिलं होतं ! माझ्यावर विषप्रयोग कुणी केलाय मला माहिती होतं !

वेगवान न्यूज नेटवर्क
28 November 2020 12:02 PM

नवी दिल्ली l गानसम्राज्ञी,अनादी आणि अनंत सूरांच्या धनी; अगणित संगीत रसिकांच्या हृदयांवर विराजमान झालेला अलौकिक स्वर म्हणजे गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर! या सुमधूर गळ्यावर एकेकाळी विषप्रयोग झाला होता.

हा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पहिल्यांदाच एक गौप्यस्फोट केला आहे. बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्याशी निगडीत एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या करिअरमध्ये त्या यशशिखरावर असताना त्यांना अचानक विषबाधा झाली होती.

त्यावेळी जवळपास तीन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते.मात्र आजारपणाचा जास्त बाऊ न करता त्यांनी त्यावरही मात करत पुन्हा जोमाने काम करू लागल्या. मात्र त्यांना विषबाधा कशी झाली याविषयी त्यांना चांगलेच माहिती होते. 'माझ्यावर झालेला विषप्रयोग नेमका कुणी केलाय ते आम्हाला कळलं होते. पण त्याच्याविरोधात आम्ही काही अॅक्शन घेतली नाही. कारण आमच्याकडे काही त्याविषयी ठोस पुरावे नव्हते. पण त्यावेळी माणसाच्या अशा वागण्याचंही आश्चर्यच वाटतं.

आजही तो किस्सा आम्ही कोणीही विसरू शकलो नाही. ब-याच जणांना याविषयी फारसे काही माहितीही नाही.हा विषप्रयोग कुणी केला, हे त्यावेळी लता मंगेशकर यांना कळलं होतं पण त्यांच्याकडे पुरावा नव्हता, असं खळबळजनक सत्य बाहेर आलंय. बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत लतादीदींनी हा खुलासा केला आहे.

लतादीदी म्हणाल्या, ही खूप जुनी गोष्ट आहे. 1963 सालची. आम्ही मंगेशकर कुटुंबीय त्याबद्दल बोलत नाही. पण त्यावेळी मला विषबाधा झाली होती. त्यावेळी मी झोपून असायचे. मला भयंकर अशक्तपणा आला होता. मला उठून चालताही यायचं नाही. मी भविष्यात चालेन की नाही असाच प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता.'

त्याकाळात अनेक अफवांना पेव फुटलं होतं. लता मंगेशकर यापुढे कधीच गाऊ शकणार नाहीत, असे डॉक्टरांनी म्हटल्याचे अनेक ठिकाणी बोलले जात होते. पण प्रत्यक्षात त्यात काहीही तथ्य नसल्याचे दीदींनी मुलाखतीत स्पष्ट केले. दीदी म्हणाल्या की, आमच्यासाठी तो फारच वाईट काळ होता. पण मी गाऊ शकणार नाही असं डॉक्टरांनी कधीच सांगितलं नाही. या सगळ्या अफवाच होत्या. उलट माझे डॉक्टर आर. पी. कपूर यांनी उत्तमरीत्या माझ्यावर उपचार केले. मी लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभी रहावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले. पण इतकी वर्षे या घटनेबद्दल उठणाऱया अफवांवर मी सांगू इच्छिते की त्या प्रकरणानंतर मी माझा आवाज गमावला नाही.

तब्बल तीन महिने लतादीदी गादीला खिळून होत्या. मात्र त्यातून बाहेर पडायची त्यांची जिद्द आणि डॉक्टरांचे उपचार यामुळे त्या बऱया झाल्या आणि पुन्हा रेकार्डिंग करू लागल्या.