breadcrumb-details

महाराष्ट्रात पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा अंदाज...

Gallery

महाराष्ट्रात पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा अंदाज...

वेगवान न्यूज नेटवर्क
24 November 2020 08:37 AM

नवी दिल्ली - तामिळनाडु, पुद्दुचेरीच्या किनाऱ्याला 25 नोव्हेंबरला चक्रीवादळ धडकणार आहे. या चक्रीवादळाचे नाव निवार असं ठेवण्यात आलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या वाऱ्याचा वेग 100 ते 120 किलोमीटर प्रतितास इतका आहे.

तामिळनाडु, पुद्दुचेरीच्या काही भागांमध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.यामुळे महाराष्ट्रातील विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

किनारपट्टीत अलर्ट दिला असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आधीच समुद्रात गेलेल्यांनासुद्धा याची माहिती देण्यात आली असल्याचं ते म्हणाले.

भारतावर दोन चक्रीवादळे घोंगावत आहे. अरबी समुद्रात गती नावाचं वादळ आफ्रिकेतील देश सोमालियामध्ये थडकल्यानंतर शांत झालं आहे. त्यामुळे आता भारताला त्याचा फारसा धोका नाही. मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या निवार वादळ वेगाने वाढत आहे.

बंगालच्या उपसागरातील वादळ पुढे सरकत आहे. सध्या पुद्दुचेरीपासून दक्षिणेकडे हे वादळ 600 किलोमीटर अंतरावर आहेत. तर चेन्नईपासून पुर्वेला 630 किलोमीटर अंतरावर आहे. पुढच्या 24 तासात हे वादळ चक्रीवादळात बदलेल असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.