breadcrumb-details

सोशल मीडियावरुन बदनामी करणाऱ्या दोषींना पाच वर्षांपर्यंत कारावास भोगावा लागणार

Gallery

सोशल मीडियावरुन बदनामी करणाऱ्या दोषींना पाच वर्षांपर्यंत कारावास भोगावा लागणार

वेगवान न्यूज नेटवर्क
22 November 2020 08:27 AM

थिरुवनंतपुरम l जगासह देशात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याच सोशल मीडियाने रातोरात कित्येकांना प्रसिद्धी मिळवून दिली आहे. मात्र काही लोकांना सोशल मीडियाने उध्वस्त केले आहे. केरळ सरकारने एक अध्यादेश काढून सोशल मीडियावरुन बदनामी करणे गुन्हा ठरविला आहे.

दोषींवर पाच वर्षांपर्यंत कारावासासह किंवा १० हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही, अशी शिक्षेची तरतूद केली आहे.

केरळच्या राज्यपालांनी अध्यादेशावर स्वाक्षरी केली असून त्याद्वारे केरळ पोलीस कायद्यात हे कलम जोडले आहे.

सोशल मीडियावरुन होणाऱ्या अशा प्रकारच्या वाढलेल्या घटनांबाबत केरळ सरकारने चिंता व्यक्त केली होती.