breadcrumb-details

तुमचा फोन स्लो झाला आहे का? किंवा सारखा हँग होतो...तर आजच हे करा , वाचा सविस्तर

Gallery

तुमचा फोन स्लो झाला आहे का? किंवा सारखा हँग होतो...तर आजच हे करा , वाचा सविस्तर

वेगवान न्यूज नेटवर्क
28 October 2020 08:59 PM

नवी दिल्ली l मोबाईल फोन एक स्पर्धा निर्माण झाली आहे .बाजारात अनेक नवीन मोबाईल फोन येत आहे .या फोन मध्ये नव नवीन फीचर्ससह अपडेट होत असतं...आपल्यापैकी अनेक असे अँड्राइड यूजर असतील की त्यांचा फोन हेवी झाला असेल किंवा सारखा हँग होत असेल.

अनेकदा तर फोन स्लो होतो. कारण अशा फोनची मेमरी फूल झालेली असते. म्हणून मोबाइलला मोकळा श्वास घेता यावा म्हणून गूगलने नवीन फाइल गो अॅलप लाँच केले आहे.

या अॅपच्या मदतीने आपण फोनमधील स्पेस मोकळी करू शकतो आणि फाइल शेअर करण्यासारखे काम पार पाडू शकतो.फाइल्स गो हे अॅप आपण सहजपणे गूगल प्ले स्टोअरमधून डाउनलोड करू शकतो.

हेअॅप अॅपलच्या फाइल शेअरिंग अॅसप एअरड्रॉपप्रमाणे काम करते. या मदतीने आपण कोणत्याही अँड्राइड डिव्हाइसवर मोठमोठ्या फाइल शेअर करू शकता. याशिवाय फोनच्या मदतीने डुप्लिकेट फाइल, न वापरण्यात येणारे अॅप आणि कमी रिझॉल्यूशनचे व्हिडिओ सहजपणे काढून टाकू शकता.

तसे पाहिले तर गूगलने या अॅपला अॅड्राइड ओरियोचे लाइट व्हर्जन अँड्रायग गोसाठी लाँच केले. मात्र अॅंड्राइड लॉलीपॉप 5.0 किंवा त्यापेक्षा वरच्या व्हर्जनच्या मोबाइलमध्ये या अॅपचा वापर करू शकतो. या अॅपचा आकार केवळ 5 एमबी आहे. या माध्यमातून आपण आपल्या फाइल्स क्लाउडवर देखील स्टोअर करू शकता.