breadcrumb-details

अरे वाह ! क्रिकेटप्रेमींना आयपीएलपूर्वीच लुटता येणार या लीगचा आनंद; वेळापत्रकाची झाली घोषणा

Gallery

अरे वाह ! क्रिकेटप्रेमींना आयपीएलपूर्वीच लुटता येणार या लीगचा आनंद; वेळापत्रकाची झाली घोषणा

वेगवान न्यूज नेटवर्क
29 July 2020 12:20 PM

नवी दिल्ली l जगातील सर्वात प्रसिद्ध टी२० लीगपैकी एक असणारी सीपीएल २०२०चे आयोजन १८ ऑगस्टपासून होणार असून यावेळी लीगमध्ये एकूण ३३ सामने खेळण्यात येणार आहेत. या सर्व सामन्यांचे आयोजन मोकळ्या स्टेडिअममध्ये होणार आहे.

कॅरिबियन प्रीमियर लीग २०२० च्या संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. टॉरूबामधील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये २३ सामने, तर पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडिअममध्ये एकूण १० सामने खेळले जाणार आहेत. या लीगचा अंतिम सामना 10 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.

उपांत्य आणि अंतिम सामने ब्रायन लारा स्टेडिअममध्ये होणार आहेत. यावेळी या लीगमध्ये भारतीय खेळाडू प्रवीण तांबेही खेळणार आहे. तो ट्रिंबॅगो नाईट रायडर्स संघाचा भाग असणार आहे.

कॅरिबियन प्रीमियर लीग २०२०चे संपूर्ण वेळापत्रक

१८ ऑगस्ट, मंगळवार- ट्रिंबॅगो नाईट रायडर्स विरुद्ध गयाना ऍमेझॉन वॉरिअर्स, सकाळी १० वाजता

१८ ऑगस्ट, मंगळवार- बार्बाडोज ट्रायडेंट विरुद्ध सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स, संध्याकाळी ५.३० वाजता
  
१९ ऑगस्ट, बुधवार- जमैका तलावाह्ज विरुद्ध सेंट लुसिया झुक्स, सकाळी १० वाजता

१९ ऑगस्ट बुधवार- गयाना ऍमेझॉन वॉरिअर्स विरुद्ध सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स, संध्याकाळी ५.३० वाजता

२० ऑगस्ट, गुरुवार- सेंट लुसिया झुक्स विरुद्ध बार्बाडोज ट्रायडेंट, सकाळी १० वाजता

२० ऑगस्ट, गुरुवार- ट्रिंबॅगो नाईट रायडर्स विरुद्ध जमैका तलावाह्ज, संध्याकाळी ५.३० वाजता

२२ ऑगस्ट, शनिवार- सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स विरुद्ध सेंट लुसिया झुक्स, सकाळी १० वाजता

२२ ऑगस्ट, शनिवार- गयाना ऍमेझॉन वॉरिअर्स विरुद्ध जमैका तलावाह्ज, संध्याकाळी ५.३० वाजता

२३ ऑगस्ट, रविवार- ट्रिंबॅगो नाईट रायडर्स विरुद्ध बार्बाडोज ट्रायडेंट, सकाळी १० वाजता

२४ ऑगस्ट, सोमवार- गयाना ऍमेझॉन वॉरिअर्स विरुद्ध सेंट लुसिया झुक्स, संध्याकाळी ५.३० वाजता

२५ ऑगस्ट, मंगळवार- सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स विरुद्ध बार्बाडोज ट्रायडेंट, सकाळी १० वाजता

२५ ऑगस्ट, मंगळवार- जमैका तलावाह्ज विरुद्ध गयाना ऍमेझॉन वॉरिअर्स, संध्याकाळी ५.३० वाजता

२६ ऑगस्ट, बुधवार- सेंट लुसिया झुक्स विरुद्ध ट्रिंबॅगो नाईट रायडर्स, सकाळी १० वाजता

२६ ऑगस्ट, बुधवार- बार्बाडोज ट्रायडेंट विरुद्ध जमैका तलावाह्ज, संध्याकाळी ५.३० वाजता

२७ ऑगस्ट, गुरुवार- सेंट लुसिया झुक्स विरुद्ध सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स, सकाळी १० वाजता

२७ ऑगस्ट, गुरुवार- गयाना ऍमेझॉन वॉरिअर्स विरुद्ध ट्रिंबॅगो नाईट रायडर्स, संध्याकाळी ५.३० वाजता

२९ ऑगस्ट, शनिवार- बार्बाडोज ट्रायडेंट विरुद्ध ट्रिंबॅगो नाईट रायडर्स, सकाळी १० वाजता

२९ ऑगस्ट, शनिवार- सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स विरुद्ध जमैका तलावाह्ज, संध्याकाळी ५.३० वाजता

३० ऑगस्ट, रविवार- बार्बाडोज ट्रायडेंट विरुद्ध सेंट लुसिया झुक्स, सकाळी १० वाजता

३० ऑगस्ट, रविवार- सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स विरुद्ध गयाना ऍमेझॉन वॉरिअर्स, संध्याकाळी ५.३० वाजता

१ सप्टेंबर, मंगळवार- जमैका तलावाह्ज विरुद्ध ट्रिंबॅगो नाईट रायडर्स, सकाळी १० वाजता

१ सप्टेंबर, मंगळवार- गयाना ऍमेझॉन वॉरिअर्स विरुद्ध बार्बाडोज ट्रायडेंट, संध्याकाळी ५.३० वाजता

२ सप्टेंबर, बुधवार- ट्रिंबॅगो नाईट रायडर्स विरुद्ध सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स,

२ सप्टेंबर, बुधवार- सेंट लुसिया झुक्स विरुद्ध गयाना ऍमेझॉन वॉरिअर्स, संध्याकाळी ५.३० वाजता

३ सप्टेंबर, गुरुवार- जमैका तलावाह्ज विरुद्ध सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स, सकाळी १० वाजता

३ सप्टेंबर, गुरुवार- बार्बाडोज ट्रायडेंट विरुद्ध गयाना ऍमेझॉन वॉरिअर्स, संध्याकाळी ५.३० वाजता

५ सप्टेंबर, शनिवार- ट्रिंबॅगो नाईट रायडर्स विरुद्ध सेंट लुसिया झुक्स, सकाळी १० वाजता

५ सप्टेंबर, शनिवार- जमैका तलावाह्ज विरुद्ध बार्बाडोज ट्रायडेंट, संध्याकाळी ५.३० वाजता

६ सप्टेंबर, रविवार- सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स विरुद्ध ट्रिंबॅगो नाईट रायडर्स, सकाळी १० वाजता

६ सप्टेंबर, रविवार- सेंट लुसिया झुक्स विरुद्ध जमैका तलावाह्ज, संध्याकाळी ५.३० वाजता

८ सप्टेंबर, मंगळवार- उपांत्य सामना १

८ सप्टेंबर, मंगळवार- उपांत्य सामना २

१० सप्टेंबर, गुरुवार- अंतिम सामना

प्रेक्षकांविनाही होणार मनोरंजन

सीपीएलमध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ट फलंदाजांचा समावेश आहे. स्वत: वेस्ट इंडिज अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळतात. सीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेमियन ओ डोनोहो (Damien O'Donohoe) यांनी म्हटले की, यावेळी सीपीएलचे आयोजन मोकळ्या स्टेडिअममध्ये नक्की होत आहे. परंतु चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी कसलीही कसर सोडली जाणार नाही.