breadcrumb-details

बीसीसीआयला ४८०० कोटींचा झटका ! डेक्कन चार्जर्सला हटवल्याप्रकरणी भरावा लागणार दंड

Gallery

बीसीसीआयला ४८०० कोटींचा झटका ! डेक्कन चार्जर्सला हटवल्याप्रकरणी भरावा लागणार दंड

वेगवान न्यूज नेटवर्क
18 July 2020 10:31 AM

मुंबई l  2009 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये जेतेपद जिंकणार्‍या आयपीएल फ्रेंचायझी डेक्कन चार्जर्सला काढून टाकण्याची बीसीसीआयला भारी किंमत मोजावे लागली.जगातील सर्वात महागड्या टी 20 लीगवर लादलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड आहे.

डेक्कन चार्जर्सला चुकीच्या पद्धतीने काढून टाकल्याबद्दल इंडियन प्रीमियर लीगला 4800 कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागेल. या प्रकरणात कोर्टाने एक 'आर्बिट्रेटर'ची नेमणूक केली, ज्यांनी बीसीसीआयविरूद्ध आपला निकाल दिला आहे. डेक्कन चार्जर्स पूर्वी डेक्कन क्रॉनिकल्स होल्डिंग्ज (डीसीएचएल) च्या मालकीचे होते.

ही 2012 ची घटना आहे. त्यावेळी हैदराबादस्थीत एका मीडिया गटाने बीसीसीआयच्या हटविण्याच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले. 14 सप्टेंबर 2014 रोजी बोर्डने चेन्नई येथे आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची तातडीची बैठक बोलावली आणि डेक्कन चार्जर्सची टीम आयपीएलमधून काढून टाकण्यात आली आणि त्यानंतर डीसीएचएलने या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पुढे या संघाची जागा सनरायझर्स हैदराबादने नंतर घेतली.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती सी. के. ठक्कर यांची नेमणूक केली. या प्रकरणात बीसीसीआयचे प्रतिनिधित्व मणियार श्रीवास्तव यांनी केले. धीर अँड धीर असोसिएट्सचे भागीदार आशिष प्यासी म्हणाले, "बीसीसीआयने डेक्कन क्रॉनिकलचा करार एक दिवसापूर्वीच संपुष्टात आणला. हे प्रकरण बेकायदेशीर होते आणि 'ट्रिब्यूनल'नेही हे चुकीचे मानले."

डेक्कन चार्जर्सचा संघ आयापीएल 2008 ते 2012 पर्यंत खेळला. अ‍ॅडम गिलक्रिस्टच्या नेतृत्वाखाली या संघाने 2009 मध्ये प्रथमच आयपीएलचे विजेतेपद जिंकले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून त्यांनी स्पर्धा जिंकली. 2012 मध्ये हा संघ बाहेर पडला आणि त्यानंतर सन टीव्ही नेटवर्कने हैदराबाद फ्रेंचायझीची बोली जिंकली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद हा नवा संघ आला.सैजन्य - महा स्पोर्ट्स News