जम्मू – कुलचोहर भागात हिजबुलच्या कमांडरचा खात्मा !

0

श्रीनगर l जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग येथील कुलचोहर भागात सैन्य आणि जम्मू-काश्मिर पोलिसांच्या सर्च ऑपरेशन दरम्यान या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये हिजबुलच्या कमांडरसह आणखी दोन दहशतवाद्यांना ठार केले. या दहशतवाद्यांकडे एके-47 आणि 2 पिस्तूल आढळल्या. या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग येथील कुलचोहर भागात सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत दहशतवादी संघटना हिजबुलचा कमांडर मसूद अहमद भट्ट मारला गेला आहे. जम्मू-काश्मिर पोलिसांनी हे मोठे यश असल्याचे सांगत डोडा जिल्हा दहशतवाद मुक्त झाल्याचे म्हटले आहे.

जम्मू-काश्मिरमध्ये सुरक्षा दल सध्या सर्च ऑपरेशन राबवत आहे. या महिन्यात सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मिरच्या संयुक्त टीमने एक डझन पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार केले आहे. शोपिया, अवंतीपोरासह अनेक भागात ऑपरेशन सुरू आहे. पोलिसांनुसार, पुलवामा जिल्ह्यातील त्राल भाग हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांपासून मुक्त झाला आहे.

काश्मिरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी काश्मिर भागाच्या पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली की, आजच्या यशस्वी अभियानानंतर त्राल भाग हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांपासून मुक्त झाला आहे. वर्ष 1989 नंतर असे पहिल्यादा घडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here