सरकारच्या ”या” योजनेतून तुम्ही ५ लाखांचा फायदा घेतलायं का ? नाही…ना.. आजच नोंदणी करा !

0

नवी दिल्ली l मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत 50 कोटी लोकांवर 5 लाखापर्यंतचे मोफत इलाज केले आहेत. पाठीमागच्या सप्टेंबर महिन्यात आयुष्यमान भारत योजना सुरु करण्यात आली होती.मात्र अनेक जणांना या योजनेबद्दल माहिती नाही.आयुष्यमान भारत योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकतो का?,तुम्ही लाभ घेतला आहे का?,या सर्व प्रश्नाची उत्तरे आता एका टोल फ्री नंबरवरुन मिळणार आहे.

अलीगड मुस्लिम विद्यापीठाला आज 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. विद्यापीठाच्या या शताब्दी समारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या यशस्वी कामगिरीचा पाढा वाचताना आयुष्यमान भारत योजनेचा आवर्जून उल्लेख केला.

सर्वात महत्वाचे तुमच्या परिवाराचं या योजनेत नाव आहे का? या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहोत का?, अशा प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. याशिवाय आपण कॉमन मिनिमम सेंटरची देखील मदत घेऊ शकतो. या योजनेअंतर्गत आरोग्य मित्र हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापासून उपचारापर्यंत संपूर्ण सहकार्य मिळू शकते.

आपण https://mera.pmjay.gov.in/search/login या लिंकवर गेल्यानंतर या योजनेसाठी आपली एलिजिबीलिटी चेक करु शकतो.

या योजनेत जवळपास 1300 आजारांवर मोफत औषधोपचार होऊ शकतात. यामध्ये कॅन्सर, ओपन हार्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, न्यूरो सर्जरी, रेडियोलॉजी यांसारख्या महागड्या आजावरच्या उपचारांचा देखील समावेश आहे.

काय आहे फायदे योजनेचे

पीएम-जेएआय पोर्टेबल योजना आहे, म्हणजेच लाभार्थी देशभरातील कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी सूचीमध्ये असलेल्या रुग्णालयात त्याचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेंतर्गत, क्लिनिकल उपचार, आरोग्य उपचार आणि औषधे रुग्णालयात दाखल होण्याचा अगोदर 3 दिवस आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 15 दिवस उपलब्ध असतील

या योजनेला कुटुंबातील सदस्यांची संख्या, वय किंवा लिंग यांचं कोणतंही बंधन नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here