हाथरस बलात्कार प्रकरण : मुली या बाजरी, मका आणि उसाच्या शेतातच का सापडतात? – भाजप नेत्यांचे संतापजनक वक्तव्य

0

नवी दिल्ली l ‘सर्व मृत मुली या बाजरी, मका आणि उसाच्या शेतातच का सापडतात? या मुली तांदूळ किंवा गव्हाच्या शेतात पडलेल्या का सापडत नाही?’ असं संतापजनक विधान भाजप आमदार रणजित श्रीवास्तव यांनी केलं आहे. त्यांचा या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल होत आहे.

उत्तर प्रदेशच्या एका भाजप नेत्याने हाथरस घटनेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. रणजित श्रीवास्तव असं या भाजप नेत्याचं नाव आहे.या व्हिडीओत हाथरस घटनेतील पीडितेबद्दल बोलताना रणजित श्रीवास्तव म्हणाले की, ‘मुलीने मुलाला बाजरीच्या शेतात भेटायला बोलावले असेल, कारण त्यांचे प्रेमसंबंध होते.

या सर्व गोष्टी सोशल मीडियावर आणि चॅनल्सवरही आहेत. या ज्या अशा प्रकारच्या मुलींचा मृत्यू होतो, त्या काहीच ठिकाणी सापडतात. या मुली उस, वाटाणा, मका आणि बाजरीच्या शेतात सापडतात. या मुली गटारांमध्ये आणि झाडाझुडपांमध्ये आणि जंगलात सापडतात.’, असं ते या व्हिडीओत म्हणाले आहेत.

या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी निर्दोष असल्याचा दावाही रणजित श्रीवास्तव यांनी केला आहे. दरम्यान, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक नेटकरी हा व्हिडीओ पाहून त्याच्या विधानाविरोधात आपला संपत व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here