हाथरस घटनेचा फायदा घेऊन राज्यात दंगली भडकविण्यासाठी विदेशातून आला 100 कोटींचा निधी

0

नवी दिल्ली l जातीय दंगली (Riots) भडकविण्यासाठी देशात शंभर कोटी रुपयांचा निधी आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हाथरस (Hathras Case) अत्याचार प्रकरणानंतर आता दररोज नव नवे खुलासे होत आहेत. या घटनेवरून देशात असंतोष निर्माण झाला होता. या वातावरणाचा फायदा घेऊन जातीय दंगली (Riots) भडकविण्याचा कट होता अशी माहीती विश्वसनीय सूत्रांनी दिला आहे.

या कामासाठी आखाती आणि इतर देशांमधून भारतातल्या काही संस्थांना तब्बल 100 कोटी रूपयांचा निधी मिळाला अशी माहिती आता बाहेर आली आहे.हा निधी 100 कोटींपेक्षा जास्त असून फक्त मॉरिशसमधूनच तब्बल 50 कोटी रूपये आल्याची माहितीही पुढे आली आहे. सामाजिक शांतता नष्ट करणे, जातीय दंगे भडकविणे ही त्यांची मुख्य उद्दीष्टे होती.

त्यासाठी हा पैसा वापरला जात होता. दंगली भडकविण्याचा प्रयत्न केल्यावरून लखनऊ आणि इतर शहरांमध्ये अनेकांवर FIR दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणाचा तपास सुरुवातीला SITकडे होता. त्यानंतर सर्व तपास हा CBIकडे देण्यात आला आहे. आता ED सुद्धा या प्रकरणात उतरली असून विदेशातून पैसे आल्याच्या प्रकरणाचा तपास करत आहेत.हाथरस घटनेनंतर त्याच रात्री ‘जस्टिस फॉर हाथरस व्हिक्टिम’ ही वेबसाईट तयार करण्यात आली होती.

प्रक्षेभक साहित्य निर्माण करून आणि बनावट पोस्ट तयार करून वातावरणात तेल ओतण्याचं काम या वेबसाईटच्या माध्यमातून केलं गेलं असाही आरोप करण्यात येत आहे.या प्रकरणी मंगळवारी आणखी एक खळबळजनक माहिती पुढे आली होती. पीडित तरूणी आणि मुख्य आरोपी संदीप याची जुनी ओळख होती आणि दोघांचं बोलणंही होत असे अशी माहिती उघड झाली आहे.

मुख्य आरोपी आणि तरूणीच्या भावांमधल्या संभाषणाची माहिती बाहेर आली असून दोघांमध्ये ऑक्टोबर 2019 ते मार्च 2020 पर्यंत तब्बल 5 तास बोलणं झालं असल्याची माहिती पुढे आली आहे.दरम्यान, या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहे.

हे प्रकरण असाधारण असून राज्य सरकारने साक्षीदारांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.या प्रकरणात आता सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पीडित कुटुंबीयांना वकील पाहिजे असल्याच त्याची माहिती देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here