सर्वात स्वस्त कोरोनावरील औषध बनविण्यात ‘या’ कंपनीला मोठं यश !

0

बंगळूरू l सिप्ला इंडिया या कंपनीकडून ‘सिप्रेमी’ नावाचं हे औषध लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. कोरोना विषाणूवर परिणामकारक ठरलेल्या रेमडेसीवीर या औषधाची जेनेरिक आवृत्ती आता बनविण्यात आली आहे. कोरोना व्हायरसवर जगभरात देण्यात येणाऱ्या औषधांतील सिप्रेमी या औषधाची किंमत सर्वाधिक कमी असणार आहे.

या औषधाच्या १०० मिलीग्रॅम कुपीची किंमत केवळ ४ हजार रूपये इतकी ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.सिप्ला इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष निखिल चोप्रा म्हणतात, महिन्याभरात सिप्रेमी या औषधाच्या ८० हजार कुप्या तयार करण्यात येणार आहेत.

कोरोनावरील या जागतिक औषधाची किंमत ५ हजारांहून अधिक असणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.दरम्यान, युरोपातील मायलॅन या कंपनीनंही रेमडेसीवीर या औषधाची जेनेरिक आवृत्ती तयार केली आहे. मात्र सिप्रेमी या औषधाची किंमत यापेक्षा ८०० रुपयांनी कमी असल्याची माहिती आता समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here