1 रुपये प्रति किलोने मिळणार धान्य ! सर्वसामान्यांसाठी आता ग्रीन रेशन कार्ड !

0

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकार वंचित असलेल्या गोरगरीबांना या ग्रीन कार्डच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभ देतील. हरियाणा, झारखंडसह अनेक राज्य सरकारांनी या दिशेने वेगाने कामं सुरू केलेली आहे.

मोदी सरकारच्या सूचनेनुसार देशातील अनेक राज्य सरकारांनी गरीब लोकांसाठी ग्रीन रेशन कार्ड योजना आणली आहे. या योजनेद्वारे गरीबांना दर एक रुपये प्रति किलोने धान्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.अनेक राज्य सरकार या वर्षाच्या शेवटी किंवा 2021 च्या सुरूवातीस ही योजना लागू करणार आहेत. झारखंड सरकार ही योजना 15 नोव्हेंबरपासून लागू करणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत रेशनकार्डपासून वंचित असलेल्या गरीब कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

एक रुपये प्रति किलोने धान्य मिळेल

ग्रीन रेशन कार्ड अंतर्गत राज्य सरकार गरीब लोकांना प्रति युनिट 5 किलो रेशन देईल. ही योजना देशातील अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केली आहे. या योजनेची सर्व जबाबदारी राज्य सरकारांकडे राहील. या योजनेची अंमलबजावणी करणारे राज्याचे प्रमुख, पंचायत सेवक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था दुकानदारांशी सतत बैठक घेत असतात. राज्य अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी तयार केलेल्या ग्रीन कार्ड संदर्भात या बैठकीत चर्चा केली जात आहे.

एकंदरीत ही योजना राज्य सरकार चालवणार आहे. ग्रीन रेशन कार्ड फक्त बीपीएल कार्डधारकांनाच उपलब्ध असेल. ही योजना केंद्र सरकारने तयार केली आहे, परंतु अंमलबजावणी व प्रत्यक्षात सुरु करण्याचे काम राज्ये करीत आहेत. फक्त बीपीएल कार्डधारकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे, परंतु बीपीएल कार्डधारक किती गरीब आहेत हे आधी पाहिले जाईल.

मात्र ग्रीन रेशन कार्डधारकांना यासाठी नव्याने अर्ज करावा लागेल.याप्रमाणे अर्ज करू शकतात
ग्रीन रेशन कार्ड मिळविण्यासाठी, तुम्ही रेशन कार्ड प्रमाणेच एक पद्धत अवलंबली पाहिजे. ग्रीन रेशन कार्डसाठी लोकसेवा केंद्र किंवा अन्न पुरवठा विभाग किंवा पीडीएस केंद्रात अर्ज करता येईल.

तसेच अर्जदार यासाठी ऑनलाईनही अर्ज करू शकतात. ग्रीन रेशन कार्ड मिळविण्यासाठी अर्जदारांना अनेक प्रकारच्या माहिती शेअर कराव्या लागतात. उदाहरणार्थ, ग्रीन रेशन कार्डासाठी आधार कार्ड नंबर, मोबाइल नंबर, बँक खात्याचा तपशील, निवासी आणि मतदार कार्ड देखील बंधनकारक असतील. ऑनलाईन अर्जही करता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here