गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकृतीस जोडे मारो आंदोलन

0

नाशिक l राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढलेल्या अप शब्दांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली पवन नगर, सिडको येथे पडळकर यांच्या प्रतिकृतीस जोडे मारून व घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीमधील नेत्यांच्या पुढेपुढे करून आमदारकी मिळविलेल्या गोपीचंद पडळकर यांनी स्वतःला प्रसिद्धी मिळावी याकरिता मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी बोलणे हे अत्यंत घृणास्पद आहे. पडळकर यांनी शरद पवार यांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना नाशिक शहरात येऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी यावेळी दिला.

यावेळी भारतीय जनता पार्टी व आ. गोपीचंद पडळकर यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी मुकेश शेवाळे, करण आरोटे, संतोष भुजबळ, डॉ.संदीप चव्हाण, सुनील घुगे, हर्षल चव्हाण, मनोज हिरे, हरीश महाजन, आनंद पाल, अक्षय परदेशी, रोहित अहिरे, मयूर शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here