गोड बातमी : चीन आपलं सैन्य मागे घेण्यास तयार !

0

नवी दिल्ली –

५ मे रोजी लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी चीनच्या हद्दीतील मोल्डो भागात भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरील बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान काही मुद्द्यांवर भारत आणि चीन यांचं एकमत झालं आहे. सोमवारी भारतीय लष्कराने भारत आणि चीन यांच्यात कमांडर स्तरावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली आहे.

या चर्चेदरम्यान सैन्य मागे घेण्याचं दोन्ही मत एकमत आहे. सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा झाली असून दोन्ही बाजू यांची अंमलबजावणी करतील, असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.यामध्ये चीन आपलं सैन्य मागे घेण्यास तयार असल्याने भारतंही आपलं सैन्य मागे घेईल असं लष्करांद्वारे सांगण्यात आलंय.

यासाठी कमांडर अधिकाऱ्यांची बैठकही झाली ज्यामध्ये सीमेवरून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

चीनने निर्णयाची अंमलबजावली केली का नाही हे पाहण्यासाठी भारतीय सैन्य 1 जूनला गलवान खोऱ्यात गेलं असता पोस्चर हटवण्यास सांगितल्यावर चीनी सैन्याने भारतीय जवानांवर हल्ला केला. यादरम्यान दोन्ही देशांत तणाव अधिकच वाढला होता. हा तणाव कमी करण्यासाठी सोमवारी बैठक घेण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here