10वी पास असलेल्यांना नोकरीची सुवर्णसंधी…

0

नवी दिल्ली l पोस्ट ऑफिसनं हिमाचल प्रदेश राज्यातील विविध जिल्ह्यांतील ग्रामीण डाक सेवकांच्या एकूण 634 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पोस्टानं नोकरभरतीला सुरुवात केली असून, लॉकडाऊनच्या काळातही अनेकांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.

या भरती अंतर्गत हिमाचल प्रदेश राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या एकूण 634 पदांची भरती करण्यात येणार आहे.हिमाचल प्रदेश पोस्टल सर्कल ऑफ इंडियाने पोस्टात ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

पोस्टातील पदांची संख्या
शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण उमेदवार ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी अर्ज करू शकतात. यासह एखाद्याला स्थानिक भाषेचे (HINDI) चांगले ज्ञान असले पाहिजे.जीडीएस भरती 2020 अंतर्गत हिमाचल प्रदेश पोस्टल सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवकांची 634 पदे भरली जाणार आहेत.

अर्ज फी
या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये अर्जासाठी शुल्क द्यावे लागेल. तर एससी-एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

वयोमर्यादा
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे.
या भरतीसाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

किती पगार मिळेल
हिमाचल प्रदेश जीडीएस भरती 2020 अंतर्गत शाखा पोस्ट मास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक या पदांवर भरती होईल. ज्यामध्ये पदांनुसार वेतन दिले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here